क्राईम
अंबाजोगाई-केज रस्त्यावर शिवशाहीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार ठार

लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : शिवशाही बस व दुचाकी अपघात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज शुक्रवारी ( दि. १३ ) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई-केज महामार्गावर डिघोळअंबा येथील कृषी विज्ञान केंद्राजवळ घडली आहे. या रस्त्यावरील वाढते अपघात चिंतेचे कारण ठरत आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, औरंगाबाद येथून लातूर कडे जात असलेली राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस क्र. MH 06 BW 0887 व दुचाकी क्र. MH 44 A 9527 यांची धडक होऊन अपघात घडला आहे. यामध्ये दुचाकीस्वार धम्मपाल साखरे रा. लोखंडी सावरगाव ( ता. अंबाजोगाई ) हे ठार झाले आहेत. हा अपघात नेमका कसा घडला याबाबत सविस्तर माहिती समजली नाही.