शेतकऱ्यांनो ई-पीक पाहणी सुरू; शासकीय योजनांसाठी आवश्यक

लोकगर्जनान्यूज
बीड : शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी सुरू झाली असून, प्रत्येकाने मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन ई-पीक पाहणी करुन आपल्या सातबारावर नोंद करणे आवश्यक आहे. यासाठी पहिले ॲप अनइंस्टॉल करुन आता नवीन ॲप डाऊनलोड करुन ही पीक पाहणी करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
मागील काही वर्षांपासून पिकांची सातबारावर ऑनलाईन पीक नोंद घेण्यासाठी मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे. या खरीप हंगामासाठी शुक्रवार (दि.१ ऑगस्ट) पासून सुरुवात झाली आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मोबाईल मध्ये ई-पीक पाहणी हा नवीन अद्यावत ॲप डाऊनलोड करुन घेणे आवश्यक आहे. याची शेवटची तारीख ही १४ सप्टेंबर २०२५ आहे. त्या अगोदर आपल्या पिकांची सातबारावर डीजिटल नोंद करुन घेणं बंधनकारक आहे.
का आवश्यक आहे ई-पीक पाहणी
शासकीय योजना जसे शेती कर्ज, अनुदान, पीक विमा, किंवा आधारभूत केंद्रावर हमाभाने कापूस, सोयाबीन विक्रीसाठी ई-पीक पाहणी आवश्यक आहे. यामुळे कोणीही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
नवीन ॲप डाऊनलोड करणे आवश्यक
आपल्या मोबाईल मध्ये जुना ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड असेलतर तो अनइंस्टॉल करा. यानंतर शासनाने अद्ययावत केलेला ई-पीक पाहणी ॲप ४.०.० हा डाऊनलोड करावा असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
येथून करा ॲप डाऊनलोड
आपल्या पिकांची ऑनलाईन साताबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी शासनाने यासाठी ई-पीक पाहणी ४.०.० हा मोबाईल ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केला आहे. हा ॲप आपल्या मोबाईल मधून प्ले स्टोअर वरुन डाऊनलोड करायचा आहे. यासाठी या खालिल लिंकवर क्लिक करुन ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करा. https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova
ॲप डाऊनलोड झाल्यावर काय करावे
ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यात पूर्ण माहिती भरुन प्रथम नोंदणी करुन नंतर ई-पीक पाहणी करायची आहे.
