जिल्हापरिषद अध्यक्ष,पं. स. सभापतींचे आरक्षण जाहीर होताच अनेकांचा हिरमोड

जिल्हापरिषद अध्यक्ष,पं. स. सभापतींचे आरक्षण जाहीर होताच अनेकांचा हिरमोड
बीड : राज्यातील जिल्हापरिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर झाले आहेत. यामध्ये बीड जिल्हापरिषद अध्यक्षपद एससी महिलेसाठी आरक्षित झाले आहे. तसेच पंचायत समिती सभापतीपदी ११ पैकी ६ महिला सदस्य राहणार आहेत. हे आरक्षण पहाता अनेकांचा हिरमोड झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. पण अद्याप सदस्यांचे आरक्षण जाहीर नसल्याने याला कधी मुहूर्त सापडणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोर्टाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या असे निर्देश दिले. यानंतर निवडणूक आयोग ॲक्शन मोड मध्ये आला तरी काम मात्र संथगतीने सुरू आहे. कोर्टाने आदेश देऊन चार महिने झाले. आताशी कुठे राज्यातील जिल्हापरिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये बीड जिल्हा परिषद अध्यक्षपद एससी महिलेसाठी आरक्षित झाले आहे. यामुळे जिल्हापरिषद निवडणुकीत एससी राखीव गटात चुरशीच्या लढती होतील असा अंदाज आहे. तर अनेकजण अध्यक्षपदासाठी गुडघ्याचा बाशिंग बांधून बसलेल्यांचा हिरमोड झाला आहे. तसेच जिल्ह्यातील अकरा पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये सहा सभापती महिला असणार असून त्यात तीन ओपन, एक एससी आणि दोन ओबीसी असणार आहेत. पाच ठिकाणी पुरुष सभापती राहणार असून त्याची माहिती मात्र अद्याप मिळू शकली नाही.