पहिल्या यादीत आमदार नमिता मुंदडांना भाजपाची उमेदवारी जाहीर
लोकगर्जनान्युज
बीड : भाजपाकडून पहिली यादी जाहीर झाली. यामध्ये बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. यामुळे केज मतदारसंघात मुंदडा यांच्या समर्थकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
येत्या २२ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. परंतु कोणाचीच उमेदवारी घोषित होत नसल्याने इच्छुकांच्या नजरा पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लागलं होतं की, उमेदवारी घोषित कधी होणार? याची उत्सुकता लागली होती. अखेर ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ केज विधानसभेतून विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ही अपेक्षित उमेदवारी होती. नमिता मुंदडा यांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी धडकताच मुंदडा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

