केज तालुक्यात खून

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यात सुर्डी येथे कठीने मारुन एका टिप्पर चालकाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खुशालराम बलभीम ठोंबरे (वय ५५ वर्ष ) रा. सुर्डी (ता.केज) असे मयताचे नाव असून, खुशालराम ठोंबरे आणि ग्रामपंचायत कर्मचारी आरोपी मंगेश भरत माने या दोघांचे घरगुती काराणावरुन सोमवारी वाद झाला होता. मंगळवारी (दि.५) खुशालराम ठोंबरे हे सुर्डी फाटा येथे एका हॉटेलमध्ये बसलेले असताना त्यांना आरोपींनी मंगेश माने आणि आणखी एकाने असे दोघांनी मिळून सोमवारी झालेल्या वादाच्या कारणावरून काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत खुशालराम ठोंबरे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने कळंब येथे उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र दवाखान्यात पोहोचताच डॉक्टरांनी तपासणी करुन मृत घोषित केले. याप्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच याप्रकरणी आरोपी मंगेश भरत माने यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.