महावितरणच्या महिला अधिकाऱ्यास ‘एसीबीचा’ शॉक; लाचखोर इंज. कोमल शिंदेला लाच घेताना पकडले

लोकगर्जनान्यूज
बीड : सोलारची पडताळणी करुन देण्यासाठी १८ हजारांची लाच घेताना आष्टी महावितरण कंपनीची महिला इंजिनिअर कोमल शिंदेला एसीबीने आज रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई बीड एसीबी कार्यालयाने केली.
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लाचखोर उघडे पडत असून, शासकीय कर्मचारी, अधिकारी यांनी जनू लाच खोरीत स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. काल सायंकाळीच गेवराई तालुक्यातील तलवडा येथील ग्रामसेवक एसीबीने पकडला आहे. एकच रात्र मध्ये गेली असता आज आष्टी येथे महावितरणची महिला इंजिनिअर एसीबीच्या जाळ्यात अडकली आहे. आज मंगळवारी (दि.२१) दुपारी सोलारची पडताळणी करुन देण्यासाठी या महिला इंजिनिअर कोमल शिंदेनी १८ हजार लाचेची मागणी केली होती. परंतु तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. याची पडताळणी करुन एसीबीने आज सापळा लावला होता. या सापळ्यात महिला इंजिनिअर लाच घेताना सहज अडकली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.