प्रादेशिकराजकारण

बीडचं पालकत्व सुनेत्रा पवारांकडे

लोकगर्जनान्यूज
बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांचे नुकतेच विमान अपघातात निधन झाले. यामुळे बीडचे पालकमंत्री कोण? याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. यात काही नावे ही चर्चेत होती. पण आज सरकारने बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. यामुळे बीडचा पालक कोण? ही चर्चा आता थांबली आहे.
अजितदादा पवार यांनी बीडची बारामती करणार असा शब्द दिला होता. या शब्दाप्रमाणे त्यांनी कामांचा धडाका लावला होता. ही विकासकामांची गती पाहता बीडकरांना विकासाचा विश्वास आणि आशा निर्माण झाली होती. पण नियतीला हे मान्य नव्हे आणि बारमती येथे विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले आणि त्यांच्या चितेत बीडच्या जनतेचे विकासाचे स्वप्न बेचिराख झाले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. दादांकडे बीडचे पालकत्व असल्याने आता नवीन कोण अशी चर्चा होती. यात काही नावे ही चर्चेत होती. मात्र उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या बीडच्या पालकमंत्री असतील असा ही अंदाज होता. तो अंदाज खरा ठरला असून अजितदादा यांकडे पुणे आणि बीडचे पालकमंत्री पद होते ते कायम सुनेत्रा पवार यांच्याकडे कायम ठेवले आहे. यामुळे बीडचे पालकमंत्री कोण? ही चर्चा आता थांबली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button