राजकारण

इम्तियाज जलील यांच्या सभेने बीडमध्ये ‘पतंग’ ची भरारी ; सभा अन् रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद

लोकगर्जनान्युज

बीड : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी बीड येथे मोमीनपुरा भागात माजी खा. इम्तियाज जलील यांची जाहीर सभा झाली. या पूर्वी त्यांनी शहरातील विविध भागातून दुचाकी रॅली काढली होती. या रॅली आणि सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. हा प्रतिसाद पाहता बीडमध्ये प्रचारात पतंगाने प्रचारात उंच भरारी घेतली असून, एका सभेने बीडचा माहोल बदलून गेल्याचे चित्र आहे. तर यावेळी जलील यांनी सत्ताधारी फडणवीस,पवार, शिंदे यांच्यावर टीका करीत इना, मिना, डीका असल्याचे सांगत पंतगाच्या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. तर शफिक भाऊ यांनी आमची सत्ता आली तर मुलभूत सुविधा देऊ अशी ग्वाही दिली.

बीडमध्ये नगरपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच तापला आहे. जोरदार प्रचार सुरू झाला आहे. बीड नगरपरिषद निवडणुकीत एमआयएम पक्षाने आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवून आपली ताकद दाखवून दिली. तर मागच्या निवडणुकीत शहरात एमआयएमचे ९ नगरसेवक विजयी झाले होते तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला होता. यावेळी ही तसेच चित्र असून, बुधवारी (दि.२६) सायंकाळी एमआयएमचे नेते माजी खा. इम्तियाज जलील यांची प्रचार सभा झाली. यावेळी सभेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी जागा कमी पडल्याने अनेकांनी सभा ऐकण्यासाठी घरांच्या छतावर गर्दी केली होती. सर्व घरांवर माणसंच माणसं दिसत होते. यापूर्वी इम्तियाज जलील यांनी शहरातील विविध भागातून दुचाकी रॅली काढली. या रॅलीला ही अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे. हा प्रतिसाद पाहता बीडमध्ये पतंगाने प्रचारात गगन भरारी घेत्याचे दिसत असून, यावेळी ही पतंग बीडमध्ये गेमचेंजर ठरणार असल्याचे चित्र आहे. तर मागच्या वेळी पेक्षा समाजाने थोडा जोर लावला तर नगरपरिषदेत वेगळे चित्र दिसणार अशी आशा पल्लवित झाल्या आहेत. यावेळी भाषण करताना खा. इम्तियाज जलील यांनी सत्ताधारी पक्षांवर टीकास्त्र सोडले असून, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे म्हणजे इना,मिना,डीका असल्याचे सांगितले आहे. तसेच आम्ही शहराला स्वच्छ पाणी,रस्ते, वीज या मुलभूत सुविधा देण्यासाठी सक्षम असून, यासाठी आमच्या पतंग या चिन्हा समोरील बटन दाबून नगराध्यक्ष सह नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन केले. यावेळी मतदारांची मोठी गर्दी दिसून आल्याने बीडमध्ये पतंगच उडणार असे चिन्ह दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button