आडसजवळ दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली

लोकगर्जनान्यूज
आडस : येथून जवळच असलेल्या अंबाजोगाई रोडवरील सोनवळा पाटी जवळ पिकअप वाहन थांबवून चौकशी केली असता त्यांच्याकडे कटर, नायलोन दोरी, टांबी व धारदार शस्त्रे असे साहित्य मिळून आले. यामुळे ते आडस परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत होते असा संशय व्यक्त केला जात आहे. ही टोळी नाशिक जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच आरोपींना अटक करुन कोर्टात हजर केले असता त्यांना २६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कामगिरी धारुर व आडस पोलीस चौकीच्या पोलिसांनी केली.
अंबाजोगाई रोडवर आडस शिवारात शनिवारी रात्री एक पांढऱ्या रंगाचा पिकअप वाहन क्रमांक एम.एच. ४२ ए क्यू १३३० हा फिरत होता. यामुळे नागरिकांना संशय आला असता याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच धारुर व आडस पोलीस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली असा हा संशयित पिकअप आडस पासून ४ कि.मी. सोनवळा पाटी येथे मिळून आला. यास थांबवून चौकशी केली असता यामध्ये पाच इसम मिळून आले. तसेच त्यांच्याकडे दोन कटर, एक्साब्लेड, दोरी नायलॉन आणि सुती, गुलेल, धारदार दोन शस्त्रे असे साहित्य मिळून आले. यामुळे ते दरोडा टाकण्याच्या तयारीत होते असा संशय व्यक्त होत आहे. तर पोलिसांनी पाच ही जणांना ताब्यात घेऊन वाहनासह ६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आडस पोलीस चौकीचे जमादार प्रशांत मस्के यांच्या फिर्यादीवरून धारुर पोलीस ठाण्यात आरोपी भगवान रामदास गाढवे रा. नाशिक रोड, भारती मठ, देशमुख चाळ, देवळाली गाव सुभाष रोड, सुदर्शन गोरखनाथ अडके रा. नाणेगाव ता.जि. नाशिक, रफीउल्लाह शफी मोहम्मद रायनी रा. फुलपुर राजा, विस्कोहर, सिध्दार्थनगर (उत्तरप्रदेश) बकदी शहेनशाह रायनी रा. फुलपुर राजा, बिस्कोहर, सिध्दार्थनगर (उत्तरप्रदेश) इमरान ननकी रायनी रा. ओदरहीया, कोदरी जि. बलरामपुर (उत्तरप्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब भवर करीत आहेत. या टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.