ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यातील आरोपी अर्चना कुटे जेरबंद; सीआयडीने घेतले ताब्यात

लोकगर्जनान्यूज
बीड | ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यातील आरोपी अर्चान कुटे यांना अखेर जेरबंद करण्यात आले असल्याचे वृत्त असून, सीआयडी पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले आहे. यामुळे आता कुटे ग्रुपचे दोन्ही प्रमुख सापडल्याने ठेवीदारांच्या ठेवी परत मिळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
लाखो ठेवीदारांच्या विश्वासाला हादरा देत कुटे ग्रुपच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत मोठा घोटाळा करण्यात आला. या ठेवी परत मिळत नसल्याने सुरेश कुटे, अर्चना कुटे यांच्यासह मल्टीस्टेटच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे दाखल होताच हे सर्वजण फरार झाले होते. परंतु मागील वर्षभरापूर्वी पोलिसांनी सुरेश कुटेंना ताब्यात घेतले असून ते सध्या कारागृहात आहे. पण तेंव्हा पासून आरोपी असलेल्या अर्चना कुटे या फरार होत्या, त्यांना शोधून अटक करण्याची मागणी सतत करण्यात येत होती. तर त्या सापडत ही नव्हत्या आणि ठेवीदारांना ठेवी ही परत मिळत नव्हत्या परंतु यासाठी वेळोवेळी आंदोलने होत असल्याने तसेच हे प्रकरण विधानसभेच्या सभागृहात गाजल्याने राज्य सरकारने याप्रश्नी लक्ष घातले आहे. पण बैठका होऊन ही याचा कवडीचा ही ठेवीदारांना फायदा झाला नाही. पण सरकारने लक्ष घातल्याने तपासाला गती आली याचे फलीत म्हणून मंगळवारी (दि.१६) अर्चना कुटे यांना सीआयडी पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले आहे. आता दोघेही पती,पत्नी ताब्यात असल्याने नेमका हा पैसा गुंतवला कुठं आणि काय झालं हे समोर येऊन काही मालमत्तांच तपास लागून यातून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळतील का? हा प्रश्न ठेवीदारां मधून विचारला जात आहे. यामुळे कोणाला अटक झाली किंवा नाही याच्याशी ठेवीदारांना कही घेणेदेणे दिसत नसून त्यांना फक्त ठेवी परत मिळाव्यात हीच अपेक्षा यावरुन दिसून येत आहे.
