सोयाबीन नोंदणीची तारीख एक महिन्याने वाढली;आ.नमिता मुंदडा यांच्या मागणीला यश

लोकगर्जानान्यूज
बीड : यावर्षी घटलेले उत्पन्न आणि बाजारात पडलेले सोयाबीनचे दर पाहता शेतकऱ्यांना पणन मंडळाचे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र हे एकमेव आधार आहे. हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. याची मर्यादा ३१ डिसेंबरला संपणार होती. शेतकऱ्यांची अडचण ओळखून रविवारी (दि.२८) आ. नमिता मुंदडा यांनी सोयाबीन नोंदणीची तारीख आणि बारदाना उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेऊन पणन मंत्रांनी सोयाबीन नोंदणीची तारीख ३१ जानेवारी २०२६ पर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेश आज सोमवारी काढले आहे. यामुळे आ. नमिता मुंदडा यांच्या मागणीला यश आले असून शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर झाली आहे. यामुळे आ. मुंदडा यांचे शेतकऱ्यांमधून आभार मानले जात आहे.
यंदा पावसाळ्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने नद्यांना पूर आला होता. यामध्ये सोयाबीन वाहून गेले तर पिकांना पाणी लागून उत्पादनात घट झाली. तसेच पावसाळा लांबल्याने सोयाबीमध्ये ओलावा आणि डॅमेज (डागिल) झाले आहेत. यामुळे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावरुन बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन परत पाठविण्याचे प्रकार होत आहेत. शेतकऱ्यांना ना विलाज म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खुल्या बाजारात कवडीमोल दराने विक्री कारावे लागतं आहे. यामुळे प्रति क्विंटल मागे ८०० ते ९०० रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. यामुळे हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्र हा शेतकऱ्यांना आधार आहे. मात्र येथे बारदाना उपलब्ध नसल्याने खरेदी बंद आहे. तसेच हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. पण या नोंदणीची शेवटची तारीख ३१ डिसेंबर होती. यामुळे आता केवळ दोन दिवस शिल्लक असल्याने नोंदणी बंद होते की, काय म्हणून सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त होते. मात्र शेतकऱ्यांचे ही चिंता आता मिटली असून, आ. नमिता मुंदडा यांनी दि. २८ रोजी सोयाबीन खरेदी केंद्राना बारदाना उपलब्ध करुन देण्याची तसेच ऑनलाईन नोंदणीची तारीख एक महिन्याने वाढवून देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि पणन मंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. या पत्राची पणन मंत्रांनी तातडीने दखल घेतली आहे. आज पणन मंडळाचे कक्ष अधिकारी अनिरुद्ध देशपांडे यांच्या स्वाक्षरीने आज आदेश काढून सोयाबीन हमीभाव विक्रीसाठी एक महिन्याने वाढवली असून आता यासाठी ३१ जानेवारी २०२६ ही शेवटची तारीख आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांची अडचण ओळखून आ. नमिता मुंदडा यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि तारीख वाढल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. याबद्दल आ. नमिता मुंदडा यांचे आभार मानले जात आहे.

