बनावट सोने देवून सोनाराने लावला बडोदा बँकेला चूना

फसवणूक करणाऱ्या सोनाराच्या पुण्यातून मुसक्या आवळल्या
लोकगर्जनान्यूज
बीड : येथील बडोदा बँकेने सोनं परिक्षणासाठी नेमलेल्या सोनारानेच बनावट सोने देऊन बँकेची फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुन्हा दाखल करुन संबंधित सोनाराच्या पुण्यातून मुसक्या आवळल्या आहेत.
अनेक बँका, फायनान्स, मल्टीस्टेट, सोसायट्या सोने तारण कर्ज देताहेत. यासाठी या संस्था, बँका सोने तारण कर्ज देण्यासाठी सोनं परिक्षणासाठी एक सोनार नेमतात. त्याकडून परिक्षण आणि वजण करुन नंतर ग्राहकांना कर्ज देतात. बीड येथी बडोदा बँकेने सोनं परिक्षणासाठी नेमलेल्या सोनारानेच कर्जदार शोधून त्यांच्या माध्यमातून बँकेत बनावट सोने ठेवून बँकेची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बँकेने विलास ज्लेलर्सचा विलास उदावंत, रा. पंडित नगर, नगर रोड, बीड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तो फरार असल्याने बीड पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर त्याच्या पुण्यातून मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार, पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बाबा राठोड, पोलिस अंमलदार राम पवार, सुशेन उगले, शौकत शेख यांनी केली.