..तर निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या; उच्च न्यायालय

लोकगर्जनान्यूज
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम मशीनचाच वापर होणार आहे. पण यामुळे मतदाराने कोणाला मतदान केले हे समजावे म्हणून व्हीव्हीपॅट मशीन लावणं आवश्यक आहे. पण ती मशीन लावणं अशक्य आहे असे सांगितले आहे. या विरोधात काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल गुडघे यांनी नागपूर खंडपीठात अपील केले होते. यावर शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने व्हीव्हीपॅट मशीन आवश्यक असून जर शक्य असेल तर मग निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी असे निर्देश देत निवडणूक आयोगाला नोटीस दिली आहे.
न्यायालयाने व्हीव्हीपॅट ची मतदानाच्या पारदर्शकतेसाठी आणि मतदारांना विश्वास पटावा की, मी कोणाला मतदान केले आहे. यासाठी आवश्यक आहे. याबाबत आधीच कोर्टाने म्हटले आहे. या याचिकेवर आज शुक्रवारी न्यायमूर्ती यांच्यासमोर सुनावणी झाली. यानंतर न्यायालयाने निर्देश दिले आहेत. तसेच व्हीव्हीपॅट मशीन नसेल तर निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. तसेच यामुळे लोकशाही बळकटी साठी व्हीव्हीपॅट आवश्यक आहे. यावर पुन्हा सुनावणी होणार असल्याने कोर्ट तेंव्हा काय निर्णय घेणार, व्हीव्हीपॅट मशीन असणार की, मग निवडणुका बॅलेट पेपरवर होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.