धक्कादायक! बीडमध्ये मनोज जरांगे असलेल्या लिफ्टला अपघात

लोकगर्जनान्यूज
बीड : येथे रुग्णाला भेटण्यासाठी आलेले मनोज जरांगे पाटील लिफ्टने दुसऱ्यामजल्यावय जाताना अचानक लिफ्ट बंद पडून ती थेट जमिनीवर आदळल्याची धक्कादायक घटना काही वेळापूर्वी घडली आहे. जरांगे पाटील सह सहकार्यांना लिफ्टचा दरवाजा तोडून बाहेर काढले असून, सर्वजण सुखरुप आहेत. परंतु या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आज बीड येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाला भेटण्यासाठी आलेले होते. सदरील रुग्णावर दवाखान्याच्या दुसऱ्या मजल्यावर उपचार सुरू असल्याने मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे काही सहकारी लिफ्ट द्वारे दुसऱ्या मजल्यावर जात होते. लिफ्ट दुसऱ्यामजल्या जवळ पोहोचली ही होती. पण अचानक ती बंद पडली अन् काही समजण्याआधी ती दुसऱ्या मजल्यावरून जमीनीवर कोसळी आहे. यानंतर मदतीसाठी धावून लिफ्टचा दरवाजा तोडून जरांगे पाटलांसह इतर सहकार्यांना बाहेर काढले आहे. हा धक्कादायक प्रकार घडल्याचे लक्षात येताच बीड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
