राजकारण

तोडण्याची नाही तर जोडण्याची अन् जातीची नव्हे तर विकासाची भाषा येते – नंदकिशोर मुंदडा

पहिली अन् शेवटची संधी द्या अंबाजोगाई शहराला मॉडेल बनविणार

लोकगर्जनान्यूज

बीड : अंबाजोगाई शहरात अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीच्या प्रचाराला गती आली असून, यावेळी झालेल्या बैठकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा यांनी प्रचार बैठकीत केवळ विकासाचे मुद्द्यांवर बोलून विरोधकांना उघडे पाडले तसेच मला तोडण्याची नव्हे तर जोडण्याची आणि जातीची नव्हे तर विकासाची भाषा येते. अंबाजोगाई शहराचा विकास हाच आमचे स्वप्न आहे. एक संधी द्या अंबाजोगाईला राज्यातील शहरांचा मॉडेल बनविणार अशी ग्वाही नगराध्यक्षपदाचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा यांनी दिली. ते अंबाजोगाई येथे प्रचार बैठकात बोलत होते.

अंबाजोगाई शहरात मुंदडा विरुद्ध मोदी अशी सरळ लढत होत आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वात जास्त चुरशीची लढत म्हणून अंबाजोगाई नगरपरिषदेकडे पाहिले जात आहे. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना उभे करणारे नंदकिशोर मुंदडा हे स्वतः नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवित आहेत. त्यांना शहरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. हे पाहता विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. तर नंदकिशोर मुंदडा हे मतदारांच्या समोर विकास आणि सलोख्याची भाषा घेऊन जात आहेत. त्यांनी आमदार म्हणून केलेल्या कामांची यादीच वाचून दाखवित आहेत. ४७ वर्षांच्या राजकीय कारकीर्द लोकांसमोर मांडत आहेत. याकाळात डॉ. विमलताई मुंदडा यांच्या कार्यकाळातील कामे असतील किंवा मागील ६ वर्षातील आ. नमिता मुंदडा यांच्या कामाची यादी ते लोकांसमोर मांडत आहेत. त्यात अंबाजोगाई शहरातील रस्ते, आरोग्य, वीज कामे यावर भर आहे. मागील चार वर्षांच्या काळात अंबाजोगाईसाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे सुरू असलेले काम, शहरात झालेली प्रशस्त रस्ते केले हे सांगत असताना त्यांनी विरोधकांना तुम्ही ३५ वर्षात काय केले असा प्रश्न उपस्थित केला. तसेच पाणीपुरवठा ५ दिवसाला करु म्हणता मग ३५ वर्ष का केला नाही? सवाल विचारला जात आहे. माझ्या घरात नगराध्यक्षपद यावे हा विचार माझ्या मनात कधी आला नाही. पण विरोधकांनी ३५ वर्षात काहीच केले नाही. पैसा टाका आणि पैसा कमवा हे धोरण राबवले आहेत. शहर भकास केलं आहे. यामुळे शहराला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी व कार्यकर्त्यांच्या अग्राह खातर निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असे सांगत शहरातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसी मंजूर करुन घेतली असून, त्यासाठी मांडवा रोडवरील जागा ही निश्चित करण्यात आली. तसेच मला माणसांमध्ये राहण्याची सवय असल्याने मी माणस जोडण्यासाठी काम करतो तोडण्यासाठी नाही. तर विकास समजतो जातीवाद नाही. त्यामुळे माझा सलोख्याला प्राधान्य आहे. पावणे पाच वर्ष दिवाळी अन् १५ दिवस केलेली विकासकामे यावर चर्चा असते. या नगरपरिषद निवडणुकीत माझ्या सह शहर परिवर्तन जनविकास आघाडीच्या उमेदवारांना एकदा संधी द्या असं काम करेन की, तुम्हाला तक्रार करण्याची संधी देणार नाही असे आवाहन नंदकिशोर मुंदडा यांनी केले. यावेळी अक्षय मुंदडा, शेख रहीम यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. याप्रचार सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी मुस्लिम समाजाने ही ठिकठिकाणी नंदकिशोर मुंदडा यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे अंबाजोगाई मध्ये परिवर्तन घडून जनविकासाची सत्ता येणार असे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button