प्रादेशिकराजकारण

जिल्हापरिषद निवडणुका केल्या जाहीर पण ही तारीख बदलण्याची निवडणूक आयोगावर नामुष्की ओढावणार?

लोकगर्जनान्यूज
राज्य निवडणूक आयोगाने अखेर अर्धवट जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केली. पण यात एक तारीख अशी आहे जी निवडणूक आयोगाला बदलावी लागू शकते. कार केवळ १२ जिल्हापरिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. २० जिल्हापरिषदेच्या निवडणुका मागे आहेत. मग निवडणूक आयोग निकाल कसा घोषित करणार यामुळे नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत निकालाची तारीख बदलावी लागली तसेच यावेळी ही घडू शकते अन् निवडणूक आयोगावर पुन्हा तारीख बदलण्याची नामुष्की ओढवली जाऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे.

चार वर्षांपासून रखडलेल्या जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकांचा बिगूल वाजला असला तरी यामुळे कंही खुशी कंही गम असे चित्र आहे. कारण निवडणूक आयोगाने राज्यातील ३२ पैकी केवळ १२ जिल्हापरिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकीचा प्रोग्राम घोषित केला आहे तो अर्धवट आहे. पण उशिरा निवडणूक जाहीर होऊन निवडणूक आयोगावर निकालाची तारीख बदलण्याची नामुष्की ओढावणार आहे. कारण राज्यातील १२ जिल्हापरिषदांच्या निवडणुका होत आहेत. आणि २० जिल्हापरिषदेच्या निवडणुका मागे राहिल्या आहेत. या १२ जिल्हापरिषदेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर केला तर त्याचा परिणाम दुसऱ्या टप्प्यातील जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकांवर होईल म्हणजे कोणीतरी न्यायालयात जाणार जसे नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी झाले आणि इकडे मतदान सुरू असताना तिकडे निवडणूक आयोगाला निकाल पुढे ढकलावा लागला होता. असेच जिल्हापरिषद निवडणुकीत होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. पुढल्यास ठेच लागली तर मागचा सावध होतो असे म्हटले जाते पण कधी नव्हे तो निवडणूक आयोग यावर्षी अनेकवेळा तोंडघशी पडले तरी ते सुधारण करुन घेताना दिसत नाही.

दोन्ही टप्प्यांचा निकाल एकाच वेळी लागला तर दुसरा टप्प्याची निवडणूक वेळेत होणार

निवडणूक आयोगाने जिल्हापरिषद निवडणुकीचा पहिल्या टप्प्याचा प्रोग्राम जाहीर केला. आणि दुसरा टप्पा मागे ठेवला असला तरी त्याच्या निवडणुका कधी होणार हे गुलदस्त्यात आहे. पहिल्या टप्प्याचा निकाल खरंच ७ फेब्रुवारीला जाहीर झाला तर या दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका कधी होतील याची काही खात्री नसून जर वेळेतच दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका होण्यासाठी दोन्हींचा निकाल एकाचवेळी लागायला हवा अशी चर्चा नागरिक करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button