क्राईम

केज तालुक्यात भरदिवसा चाकूचा धाक दाखवून एकास लुटले

लोकगर्जनान्यूज

केज : दुचाकीवरुन जाणाऱ्या एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याचे लॅकेट लुटून चोरटे पसार झाल्याची घटना आज बुधवारी (दि.१८) सकाळी १०:३० वाजता केज-कळंब रस्त्यावर सुर्डीपाटी येथे घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्या आधारे युसुफ वडगाव पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, सेवानिवृत्त वाहन चालक भिसे (पूर्ण नाव समजू शकले नाही) हे दुचाकीवरून जात असताना त्यांना दोघा अनोळखी व्यक्तींनी अडवून त्यांच्या गळ्याला चाकू लावला भिसे यांच्या गळ्यातील सैन्याची चैन घेऊन पसार झाले. ही घटना सकाळी १०:३० च्या सुमारास भरदिवसा आणि वर्दळीच्या ठिकाणी सुर्डीपाटी येथे घडली आहे. हे दोन्ही चोरट्यांनी हेल्मेट लावलेले होते. ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती घेऊन सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करुन त्या आधारे चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी दुपार पर्यंत पोलिसात नोंद नव्हती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button