आडसचे गणेश आकुसकर नाशिकचे उपशिक्षणाधिकारी

लोकगर्जनान्यूज
आडस : येथील रहिवासी जिल्हापरिषद माध्यमिक शाळा धारुरचे मुख्याध्यापक गणेश कांताराव आकुसकर यांची नाशिक येथे उपशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली. या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
गणेश आकुसकर हे जिल्हापरिषद माध्यमिक शाळा धारुर येथे मुख्याध्यापक असून त्यांनी येथे उत्कृष्ट काम केले आहे. सेवेत असतानाच शासनाच्या वतीने घेण्यात आलेली उपशिक्षणाधिकारी पदासाठी त्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्यांनी यश संपादन केले. त्यांची जिल्हापरिषद नाशिक जिल्हापरिषद शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली. हे आदेश त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. या यशाबद्दल त्यांचे मित्र परिवारातून व शिक्षणक्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे. आडस येथील व्यंकटराव नेटके हे शिक्षणाधिकारी होते. त्यांच्यानंतर गणेश आकुसकर हे उपशिक्षणाधिकारी झाले आहेत.